कराड: मुख्यमंत्री झाल्यापासून पृथ्वीराज चव्हाण यांनी विकासकामांमध्ये कधीच दुजाभाव केला नाही. याउलट गटतट न पाहता त्यांनी मुख्यमंत्री असताना अठराशे कोटींची कामे केली. यामध्ये कराड दक्षिण मतदारसंघातील गाव अन गाव आणि वाडीवस्तीवर विकास साधला. त्यांच्या या दूरदृष्टीच्या विचारातून कराड दक्षिणच्या टोकावरील जिंती गावच्या विकासालाही त्यांनी मोठे पाठबळ दिले आहे, असे मत युवा नेते इंद्रजीत चव्हाण यांनी व्यक्त केले. जिंती (ता. कराड) येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून कोळे ते जिंती रस्त्यासाठी राज्यस्तरीय वार्षिक अनुदानातून १ कोटी ४० अनुदानापैकी उंडाळे ते जिंती रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणासाठी ४० लाख रुपये व २५१५ या योजनेतून जिंती हायस्कूल ते जिंती गावाकडे जाणारया रस्त्यासाठी १५ लाख रुपये तसेच मौजे जिंती येथील चव्हाणमळ्याकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणेसाठी १० लाख रुपये आदी कामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. प्रभारी सरपंच अशोक पाटील अध्यक्षस्थानी होते. कराड दक्षिण काँग्रेसचे संघटक उदय पाटील-उंडाळकर, धैर्यशील मोहिते, प्रभाकर घारे, उपसरपंच जयवंत शेवाळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रघुनाथ देसाई, दिलीप खोचरे, मेहुल अंबवडे, सुशांत पाटील, जितेंद्र पाटील, अशोक चव्हाण, उत्तम सुर्वे, शरद शिंदे, सुरेश अंबवडे, एकनाथ पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. इंद्रजीत चव्हाण म्हणाले, गेल्या पाच वर्षात आपले सरकार नसतानाही पृथ्वीराजबाबांनी मतदारसंघात कोट्यवधींचा निधी आणला. त्याच धर्तीवर ते याही पाच वर्षात मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांच्या दृदृष्टीतून अनेक प्रकल्प येत्या पाच वर्षात साकारणार आहेत. त्यातून मतदारसंघाच्या विकासाला गती येईल. __ अशोक पाटील म्हणाले, पृथ्वीराजबाबांच्या माध्यमातून आमच्या गावाला भरघोस निधी मिळाला आहे. मी व सर्व ग्रामस्थांनी याकामी पाठपुरावा केल्यामुळे गावचा विकास साधता आला. आतापर्यंत बाबांच्या माध्यमातून शिंदे वस्तीमध्ये काँक्रीटीकरण, बौध्द वस्ती ते शिंदे वस्ती डांबरीकरण, सार्वजनिक आड ते लामणे दरा डांबरीकरण, खोचरेवाडी येथे समाजमंदिर, पाच सिमेंट व दहा माती बंधारे तसेच जलयुक्त शिवार योजनेतून ४१ किलोमीटरची सलग समतल चर उभारण्यात आली आहे. पुढील कालावधीत जिंती ते शेवाळेवाडी रस्ता डांबरीकरण, दलितवस्तीमधील स्मशानभूमीची सुधारणा व पाणीपुरवठा तसेच गटार बांधणी त्याचबरोबर सार्वजनिक आड ते जाधवकी रस्ता डांबरीकरण, बागेचा ओढा ते कुलकर्णी पट्टी रस्ता डांबरीकरण, बीएसएनएल टॉवर ते डुबलकी रस्ता डांबरीकरण व मराठी शाळा ते चव्हाण वस्ती रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा आमचा संकल्प आहे. तो पूर्ण करण्यामध्ये पृथ्वीराजबाबांचे सर्वोतपरी सहकार्य मिळणार आहे. मेहुल अंबवडे यांनी आभार मानले.
जिंतीच्या विकासासाठी पृथ्वीराजबाबांचा मोलाचा वाटा इंजीत चव्हाण