मसूर: फड सांभाळ तुऱ्याला ग आला...तुझ्या ऊसाला लागलं कोल्हा... या मराठमोळ्या लावणीची आठवण व्हायची ते उसाला फुटलेले तुरे पाहून, अशी परिस्थिती काही ठिकाणी पाहायला मिळायची. मात्र यावर्षी झालेल्या धुवाधार पाऊसाने आणि परतीचा मुसळधार पाऊस यामुळे संपूर्ण कराड तालुक्यातील उसाला तुरा आला असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यातच गळीत हंगाम उशिरा सुरू झाल्याने उर्वरित उसालाही तुरा फुटण्यास सुरुवात झाली आहे. ऊसाला तुरा आल्यामुळे उसाच्या वजनात घट होत असते. यामुळे शेतकऱ्यांचे ऊसाची टनेज घटल्याने आर्थिक नुकसान होणार आहे. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा सरासरी पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच पावसाळ्यात जोरदार पाऊस पडल्यानंतर परतीच्या पावसाचा मुक्काम संपूर्ण तालुक्यात खूप दिवस राहिला. त्यातच शासनाने यावेळी गळीत हंगाम सुरू करण्यास उशीर लावला होता. त्यामुळे गळितासाठी यंदा जाणाऱ्या ऊसाला अठरा महिन्यापेक्षा जास्त कालावधी गेला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात वाहतूक घटल्याने आर्थिक नुकसान होणार आहे. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा सरासरी पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच पावसाळ्यात जोरदार पाऊस पडल्यानंतर परतीच्या पावसाचा मुक्काम संपूर्ण तालुक्यात खूप दिवस राहिला. त्यातच शासनाने यावेळी गळीत हंगाम सुरू करण्यास उशीर लावला होता. त्यामुळे गळितासाठी यंदा जाणाऱ्या ऊसाला अठरा महिन्यापेक्षा जास्त कालावधी गेला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात वाहतूक उसाला तुरे फुटले आहेत. विशेषता आडसाली उसाला तुरे फुटलेली आहेतच, त्याचबरोबर खोडव्याचे ऊसालाही तुरा फुटू लागले आहेत. यापूर्वी काही ठराविक जातीच्या ऊसाला तुरा फुटत होता. तुरा फुटल्याने वजनात होणारी घट आणि उसाच्या वाड्याचा वैरणीसाठी वापर होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाच्या उत्पादनात घट होतेच त्याचबरोबर जनावरांच्या वैरणीचा प्रश्नही गंभीर बनला आहे. उसाच्या काही वाणांना ठराविक दिवसानंतर तुरा फुटत असल्याने शेतकऱ्यांनी उसाचे नवीन वाण वापरण्यास सुरुवात केली होती. तसेच पाण्याचे जास्त प्रमाण असणाऱ्या शेतात तुऱ्याचे प्रमाण जास्त येत होते. मात्र यावर्षी अतिपावसाने सर्व जातीच्या ऊसाला तुरे फुटले आहेत. काही हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या उसाला तुरे नाहीत. मात्र येत्या दहा ते पंधरा दिवसात त्या ऊसालाही कोपर्डे तुरा फुटेल अशी शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
सर्वच उसाला फुटले तुरे: वजनात होणार घटः शेतकऱ्यांचे होणार आर्थिक नुकसान